Saturday, February 7, 2026

बोगस शाळा गायब करण्याचा प्रयत्न, तडकाफडकी शाळेचे नावच बदलले ! • श्री चैतन्य टेक्नो स्कूल पुन्हा अचानक बनले किड्स किंगडम स्कूल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• मोठी कारवाई टाळण्यासाठी चालाखीचा प्रयत्न !

नांदेड (प्रतिनिधी) – येथील खुरगाव, मालेगाव रोडवर स्थित बेकायदेशीर आणि बोगस शाळेचे प्रकरण उघडकीस येताच मोठी घडामोड घडली आहे. श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही शाळाच अचानकपणे गायब करण्याचा प्रयत्न सुरु असून या शाळेच्या नावाचे मिटविण्यात आले आहे. त्या ठिकाणी पूर्वीचीच शाळा असणाऱ्या किड्स किंग्डम चे नाव लावण्यात आले आहे.

मालेगाव रोडवर असलेली श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही शाळा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची आणि बोगस असल्याचे समोर आले आहे. याबाबतचे वृत्त झळकताच ही शाळाच गायब करण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून आले आहे. भव्य अशा इमारतीवर असलेला श्री चैतन्य टेक्नो स्कूल या शाळेचा भलामोठा बोर्ड तडकाफडकी काढून टाकण्यात आला आहे. त्या ठिकाणी पूर्वीची शाळा असणाऱ्या किड्स किंग्डम स्कूल या नावाचा बोर्ड लावण्यात आला आहे.

संबंधित बातमी 👇🏻

अचानकपणे घडत असलेल्या या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांसह पालकही अचंबित झाले असून खरी शाळा कोणती आणि या शाळेचे भवितव्य काय यावरून चिंतित झाले आहेत. श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही बोगस शाळा असल्याचे उघडकीस आल्याने मोठी कारवाई टाळण्यासाठी ही सर्व चालाखी करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

•दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही शाळा बोगस असल्याचे उघडकीस आल्याने गेली काही वर्ष या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत या शाळेचे व्यवस्थापन आणि शिक्षण विभागाने तात्काळ खुलासे करावेत अशी मागणी पालकांमधून होत आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा घाणेरडा प्रकार करणाऱ्या दोषींवर क** स्वरूपाची कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

•शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवरही कडक कारवाईची मागणी
इतक्या बिनदिक्कतपणे भव्य अशा या इमारतीत श्री चैतन्य टेक्नो स्कूल या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून ही शाळा सुरू होती. ही बाब शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना माहिती नव्हती काय? त्यांनी जाणीवपूर्वक या बेकायदेशीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते काय? याची सखोल चौकशी करून करावी, तसेच शिक्षण विभागातील दोषींवरही कडक स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांच्या वतीने करण्यात येत आहे.

•मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
श्री चैतन्य टेक्नो स्कूल या बोगस शाळेच्या बाबत सखोल अशी चौकशी करण्यात यावी. आणि एकाच जागी दाखविण्यात आलेल्या या दुसऱ्या शाळेचे अस्तित्व, या गंभीर प्रकाराबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या शाळांच्या संबंधितांवर आणि शिक्षण विभागातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. ही कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!