Friday, March 29, 2024

मोटरसायकलवर निघालेल्या मित्रानेच मित्राचा खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला; भोकर तालुक्यातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– रंगकाम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये अचानक जुन्या कारणावरून वाद झाला. यानंतर एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात जबर मारहाण करून खून केल्याची घटना भोकर तालुक्यात घडली आहे. खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह भोकर तालुक्यातील ताटकळवाडी शिवारात एका कॅनलमध्ये फेकला. तब्बल एका महिन्यानंतर या प्रकरणात भोकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या पीरबुर्हाननगरमधील इंदिरानगर परिसरात रंगकाम करणारा संजय गोविंदराव अडगुलवाड (वय 35) व त्याचा मित्र प्रकाशनगर तरोडा बुद्रुक येथील रतन मधुकर सोनकांबळे (वय 24) हे दोघेजण रंगकाम करण्याचे गुत्ते घेत होते. मागील काही दिवसांपासून ते एकत्र काम करीत होते. दि. 16 एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास रतन सोनकांबळे आणि संजय अडगुलवार हे भोकर येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी निघाले. यावेळी संजय अडगुलवाड हे चाळीस हजार रुपये सोबत घेऊन निघाले.

दुचाकी क्रमांक (एमएच26- सीसी- 69 87) वरून बसून भोकरकडे जात असताना नांदेड ते भोकर जाणाऱ्या रस्त्यावर ताटकळवाडी शिवारात गदा मारुती परिसरात हे दोघेजण थांबले. जुन्या वादातून रतन सोनकांबळे यांनी संजयच्या डोक्यात जबर वार केला. यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने संजय अडगुलवाड याचा मृतदेह बाजूलाच असलेल्या कॅनालमध्ये फेकून दिला आणि तो घरी परत आला. यावेळी त्याच्याकडील चाळीस हजार रुपये रतन सोनकांबळे यांनी काढून घेतले.

संजय अडगुलवाड घरी न आल्याने आणि संपर्कही होत नसल्याने पत्नीने पती परत घरी आले नाही याबाबत रतनशी संपर्क साधून विचारणा केली. यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तर देत वेळ मारून नेली. तोपर्यंत इकडे संजय आडगुलवाड याचा शोध घरच्यांनी सुरू केला आणि दि. 17 एप्रिलच्या दुपारी ताटकळवाडी शिवारात असलेल्या कॅनलमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर व त्याची पत्नी ममताबाई संजय आडगुलवाड यांनी संशय व्यक्त केल्याने अखेर एक महिन्यानंतर या प्रकरणात रतन मधुकर सोनकांबळे विरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे व जबरी चोरी या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एन. कराड करत आहेत. घटनास्थळाला सहाय्यक पोलीस अधीक्षक शफाकत आमना आणि भोकरचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी भेट दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!