ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची मागणी
◆ अर्धापूर तालुक्यातील सावरगावात श्री हनुमान मंदिरासमोर आंदोलन
अर्धापूर (जि. नांदेड)- तालुक्यातील सावरगाव येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी व श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अन्यत्याग आंदोलन सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने किराणा दुकानांवर वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.
राज्य सरकारने ग्रामीण भागातील किराणा दुकानावर वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णयाला अनेक ठिकाणी जोरदार विरोध असल्याचे दिसून येत आहे. किराणा दुकानावर वाईन विक्रीचा निर्णय शासनाने मागे घ्यावा. या निर्णयामुळे पिढी बरबाद होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधात अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रसारक गजानन योगाजी आबादार यांनी हनुमान मंदिरासमोर अन्यत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास भारतराव आंबोरे, किसन दुकानदार जाधव, बळीराम आबादार, दत्तरामजी इंगोले, सरपंच संभाजी पांचाळ, उपसरपंच उद्धवराव आबादार, ग्रा.स.भगत जाधव, नारायण आबादार, राजू पाटील आबादार यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
निर्णय मागे घेण्याची मागणी
किराणा दुकानावर वाईन विक्रीला शासनाने परवानगी देऊ नये. त्यामुळे अनेक जण वाईनच्या आहारी जाऊन तरूण पिढी व्यवसनाधीन होईल. यामुळे महाराष्ट्र शासनाने किराणा दुकानावरील वाईन विक्रीला परवानगी देऊ नये आणि निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष छगन पाटील सांगोळे यांनी केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻