Tuesday, April 16, 2024

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुन्हा सुरू केले कोविड केअर सेंटर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ भक्ती लॉन्स येथे महापौर सौ. जयश्री पावडे यांच्या हस्ते झाले उदघाटन

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचे अनुषंगाने महानगरपालिकेच्यावतीने भक्ती लॉन्स येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांच्या हस्ते या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

नांदेड शहर आणि जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्यसेवेच्या कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी मंत्री डी पी सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे  यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती महापौर सौ. पावडे यांनी दिली. या कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना रूग्णांसाठी अत्यावश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नांदेड शहरातील नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, मात्र प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. घराबाहेर अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे, नाकातोंडावर मुखपट्टी बांधावी, हात आणि तोंड वेळोवेळी स्वच्छ ठेवावे आणि सॅनिटायझरचा योग्य वेळी वापर करावा. इतरांशी संवाद साधत असताना सुरक्षित अंतर बाळगावे आणि कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांनी केले. नांदेड शहरात रुग्ण संख्या वाढत असली तरी आरोग्य सेवा सज्ज आहे अशी माहितीही यावेळी महापौर सौ जयश्री पावडे यांनी दिली.

सदर कार्यक्रमास आयुक्त सुनिल लहाने, उपमहापौर अ.गफार अ. सत्तार, स्थायी सभापती किशोर स्वामी, सभागृह नेता महेश कनकदंडे, महिला बालकल्याण सभापती संगिता डक, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधु, उपआयुक्त  संजय जाधव, सहाय्यक आयुक्त डॉ. सुरेशसिंग बिसेन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम भुरके, डॉ. देवानंद देवसरकर, डॉ. हनुमंत रिठ्ठे व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

दिनांक १९ जानेवारी २०२२ पासुन सदर कोविड केअर सेंटर मध्ये कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!