Saturday, November 9, 2024

14 रोजी खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री नांदेडमध्ये; माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचा अमृतमहोत्सव आणि खा. हेमंत पाटील यांच्या ‘गोदावरी अर्बन’चा सोहळा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- दिनांक 14 मे रोजी खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री नांदेडमध्ये येत आहेत. माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचा अमृतमहोत्सव सोहळा, खा. हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी मुख्य शाखेच्या इमारतीचा उदघाटन सोहळा यासह विविध कार्यक्रमांना तर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा पद्मविभूषण, माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार हे नांदेडमध्ये येत असून त्यांच्या उपस्थितीत दि. 14 मे रोजी माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास अनेक मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर 14 मे रोजीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही नांदेडमध्ये येणार असून खासदार हेमंत पाटील यांच्या जज्जजज्जजज्ज कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. खा. शरद पवार यांच्यासह इतर अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.

खा. शरद पवार हे माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव सोहळा आणि गोदावरी अर्बन मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी मुख्य शाखेच्या  इमारतीचा उदघाटन सोहळा यासह इतरही विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री इन्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर भुमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी दिली.

खा. शरदचंद्र पवार यांचे दि. 14 मे रोजी सकाळी 9.30 वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर 10 वाजता खा. हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बनच्या नांदेड येथील कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. दुपारी 12 वाजता वसमत जि. हिंगोली येथे आ. राजू नवघरे यांनी आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या फार्म हाऊसवर राखीव, दुपारी 2 वाजता नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन. 2 ते 5 या वेळेत अभ्यांगतासाठी राखीव वेळ असेल. सायंकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील श्यामराव कदम  व संचालक मंडळाच्या पद्मश्री इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच सामाजिक न्याय भवनाजवळ  भुमिपूजन सोहळा खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचा अमृतमहोत्सव सोहळा सायंकाळी 5.30 वाजता मादसवाड इस्टेट नमस्कार चौक म्हाळजा बायपास येथे आयोजित केला आहे.

या अमृतमहोत्सव सोहळ्याला खा. शरद पवार यांच्यासह माजी खा. केशवराव धोंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नांदेडचे पालकमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य व रोहयो राज्यमंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, एमजीएमचे सचिव अंकुशराव उर्फ बाबुराव कदम यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ट परिवहन मंत्री नितीन गडकरी हे ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविणार आहेत.

याचबरोबर या कार्यक्रमाला खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, खा. फौजिया खान, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, माजी खा. भास्कराव पाटील खतगावकर यांच्यासह आजी-माजी खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे डॉ. सुनील कदम यांनी दिली.

10 मे रोजी आदित्य ठाकरे तर 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्यावर

शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हेही येत्या आठवड्यात नांदेड दौऱ्यावर येत आहेत. दिनांक 14 मे रोजी शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरी अर्बन मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी मुख्य शाखेच्या इमारतीचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे.

तत्पूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे दिनांक 10 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. या दौर्‍यात वाडी बुद्रुक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय इमारत भूमिपूजन आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील  विविध विकास कामांचे उदघाटन आणि भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार अनुसायाताई खेडकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, सहसंपर्कप्रमुख धोंडू पाटील, भुजंग पाटील, प्रकाश मारावार यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हा शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक दिनांक 7 मे रोजी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस शिवसेनेचे आजी -माजी पदाधिकारी, आजी- माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडीच्या आजी-माजी पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, शहर प्रमुख सचिन किसवे, शहर प्रमुख तुळजेश यादव यांनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!