ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर : दहावीच्या निकालात एकीकडे लातूर बोर्डातील ७० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण घेत लातूर पॅटर्नचा दबदबा अधोरेखित केला आहे. तर दुसरीकडे लातूरच्याच एका पट्ठ्याने सर्वच्या सर्व विषयात मोजून ३५ गुण घेण्याची अजब किमया साधली आहे.
यंदाच्या निकालात १०० टक्के गुण घेणाऱ्या ७० विद्यार्थ्यांनी ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा कायम राखला आहे. तर दुसरीकडे ३५ टक्के गुण घेणाऱ्या लातूर तालुक्यातील गुंफावाडीच्या अमर विठ्ठल सुरवसेची ही पंचक्रोशीत तसेच सोशल मीडियातून जोरदार चर्चा आहे. सर्व विषयात ३५ गुण घेण्याची किमया कुठल्याही विद्यार्थ्यांना ठरवूनही करता येत नाही. मात्र त्याबाबतीत काठावर फळफळलेल्या या नशिबाचा आनंद आपल्या मित्रांना मिठाई खाऊ घालून साजरा करतो आहे.
३५ टक्के गुण घेणाऱ्या अजब किमया साधणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे अमर विठ्ठल सुरवसे… मूळचा लातूर तालुक्यातील गुंफावाडी गावचा विद्यार्थी… लातूर तालुक्यातील मुरुडच्या जनता विद्यामंदिर हा विद्यार्थी… शाळेत दररोज न चुकता उपस्थिती लावणाऱ्या अमरला दहावीच्या परीक्षेत पास होण्याची गॅरंटी नव्हती. मात्र आज दुपारी अमर सुरवसेच्या हातात ज्यावेळी निकाल पडला, तेंव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान-तंत्रज्ञान तसेच सोशल सायन्स या सर्वच्या सर्व विषयात मोजून ३५ गुण मिळाले होते. एकीकडे पास व्हायची गॅरंटी नसलेल्या अमरला मोजून ३५ टक्के गुण मिळाल्याची किमया साध्य झाल्याचा मनःपासून आनंद होतोय.
बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या अमरच्या घरची परिस्थिती ही तशी बेताचीच. घरात तसे शैक्षणिक वातावरण नव्हते. दोन मोठ्या बहिणी त्याही दहावी पास. मोठं होऊन आर्मी मध्ये जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अमर हा बालपणापासून बघतोय. त्याला ३५ टक्के गुण मिळाल्यानंतर दै. गोदातीर समाचारने त्याच्याशी संवाद साधल्यानंतर आपले देश सेवेचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. पुढचे शिक्षण घेऊन आर्मीमध्ये भरती असा मनोदय अमरने व्यक्त केलाय.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻