Friday, March 29, 2024

अर्धापूरमध्ये एका फरार उमेदवाराने केला माजी नगराध्यक्षांचा पराभव; काँग्रेसची हॅट्ट्रिक, ‘एमआयएम’चेही लक्षवेधी यश

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ एमआयएमचे मिर्झा शहबाज बेग यांनी फरार राहून निवडणूक जिंकली

◆ अर्धापूर नगरपंचायतीवर तिसऱ्यांदा ना.अशोकराव चव्हाण यांचे वर्चस्व

◆ अनेक दिग्गजांचा धक्कादायक पराभव

◆ काँग्रेस १०, एमआयएम ३, भाजपा २, राष्ट्रवादी १, अपक्ष १

अर्धापूर (जि. नांदेड) –  नगरपंचायतच्या १७ जागेसाठी दि.१९ बुधवारी रोजी सकाळी मतमोजणी झाली. यात अनेक आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. अर्धापूरमध्ये १० जागा मिळवत काँग्रेसने येथे तिसऱ्यांदा सत्ता मिळविली असली तरी येथे ‘एमआयएम’नेही जोरदार एन्ट्री केली आहे. काँग्रेस १०,एमआयएम ३,भाजपा २,राष्ट्रवादी १,अपक्ष १ असा निकाल जाहीर निवडणूक निर्वाचन अधिकारी यांनी जाहीर केला.

नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेस पक्षाने बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. आणि मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही नगरपंचायत तिसऱ्यांदा काँग्रेसच्या ताब्यात दिली आहे. या विजयासाठी आ.अमरनाथ राजूरकर,निवडणूक प्रभारी सभापती किशोर स्वामी, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे,शहराध्यक्ष राजेश्वर शेटे यांनी जोरदार प्रचार व यंत्रणा लाऊन नगरपंचायतींवर वर्चस्वाची हॅट्रिक साधली आहे. भाजपा कडून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, निवडणूक प्रभारी आ.राम पाटील, जेष्ठ नेते धर्मराज देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख यांनी आपल्या स्तरावर यंत्रणा लाऊन जोरदार प्रचार केला, पण भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नसल्याचे निकालावरून दिसते. ‘एमआयएम’चे मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला यांच्यासह त्यांच्या टीमने निवडणुकीत जोरदार प्रचार केला.

या निवडणुकीत काही आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. एमआयएमचे  वार्ड क्र.१३ मधील उमेदवार मिर्झा शहबाज बेग यांनी तर निवडणूकीत फरार राहून निवडणूक लढविली आणि ती जिंकली देखील! त्यांनी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण यांचा १६५ मतांनी मोठा पराभव केला आहे. मिर्झा शहबाज बेग यांच्या या विजयाची जोरदार चर्चा होत आहे. शहबाज बेग यांच्या समर्थकांनी बँड लावून मिरवणूक काढत जल्लोष केला. 

या नगरपंचायत निवडणूकीत अनेक मातब्बर नेते मंडळींना धक्कादायकपणे पराभव पत्करावा लागला आहे. यात भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, माजी उपनगराध्यक्ष मिर्जा पप्पु बेग, भाजप नेते धर्मराज देशमुख यांच्या पत्नी मीनाक्षी देशमुख यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.

निवडणूक मतदान मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी विकास माने, निवडणूक साहाय्यक अधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार उज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, मुख्याधिकारी शैलेश फडसे, अभियंता नागनाथ देशमुख, आनंद मोरे यांनी परिश्रम घेतले. ही निवडणूक आणि मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवी, पोउनी साईनाथ सुरवशे, पोउनि कपिल आगलावे, पोउनी बळीराम राठोड, भिमराव राठोड, पोउनी तय्यब आदींनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

विजयी उमेदवार:

१)सौ.शालीनीताई राजेश्वर शेटे – काँग्रेस 
२) बाबुराव लंगडे – भाजपा 
३) शेख जाकीर – राष्ट्रवादी 
४) डॉ.पल्लवीताई विशाल लंगडे – काँग्रेस
५)सौ.कानोपात्रा प्रल्हादराव माटे – भाजपा
६)सोनाजी सरोदे – काँग्रेस
७) छत्रपती कानोडे – काँग्रेस
८)सौ.वैशालीताई प्रविण देशमुख – काँग्रेस
९)सौ.मिनाक्षी व्यंकटी राऊत – काँग्रेस
१०) मक्तेदरखान पठाण – अपक्ष
११) सायेरा बेगम काजी सल्लावोद्दीन – काँग्रेस
१२)यासमान सुलतांना मुस्वीर खतीब – काँग्रेस
१३)शहबाज बेग – एमआयएम
१४)रोहीनी हिंगोले – एमआयएम
१५) खमर बेगम – एमआयएम
१६) सलीम कुरेशी – काँग्रेस
१७) नामदेव सरोदे – काँग्रेस

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!