Friday, February 23, 2024

आणखी एक ट्विस्ट: देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतली शपथ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई- एकनाथ शिंदे यांनी आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच, अचानकपणे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा हा सोहळा पार पडला.

संबंधित बातमी 👇🏻

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून आधी सर्वांनाच धक्का दिला. पण त्यानंतर आणखी एक ट्विस्ट येऊन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात सहभागी व्हावे, अशी सूचना केली. त्यानंतर अगदी थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत शिंदे यांच्या मंत्रीमंडळात फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनणार आहेत, असे सांगितले. त्यामुळे फडणवीस आता उपमुख्यमंत्री बनले आहेत.

राज्यपालांना पत्र दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली. त्यावेळी त्यांनी आपण नव्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र आपण सरकार व्यवस्थित चाललण्यासाठी मी बाहेर राहून काम करीत राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी आपली स्वतःची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचाही तसा आग्रह आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!