ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ ३४ नदीघाटांचे केले वाटप
नांदेड– शहर व परिसरात अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. वाळू माफियांवर कारवाई केली तरीही वाळू उपसा सुरूच आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी ३४ वाळु घाटांची जबाबदारी तीन तहसीलदारांच्या खांद्यावर टाकली आहे.
गोदावरी नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा महसूल विभागाकडून आजवर अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. कधी नदीपात्राकडे जाणारया रस्त्यावर उतरून वाहनांना रोखणे तर कधी नदीपात्रात धाड टाकून तराफे जाळले. नांदेड तालुक्यातील 90% वाळू घाटांचा लिलाव पर्यावरणाच्या कारणामुळे झाला नाही. ज्या वाळू घाटांचे लिलाव जिल्हा प्रशासनाने ठेवले त्याला ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही. महसूल विभागाकडे रॉयल्टी भरण्यापेक्षा अवैध उपशातून जादा काळी कमाई होत असल्यामुळे वाळू माफियांकडून अनधिकृत उपशावर अधिक भर दिला जातो. पूर्वीच्या काळात जे घाट काही कोटींमध्ये गेले होते ते आता महसूलच्या तिजोरीत कवडीमोल ठरले आहेत.
तीन तहसीलदार व त्यांच्या निगराणीखालील वाळूघाट
तहसीलदार किरण आंबेकर यांच्याकडे मार्कंड, गंगाबेट, भनगी, पिंपळगाव निमजी, वाहेगाव, राहाटी, सोमेश्वर, जैतापूर, पिंपळगाव कोरका, थुगाव, बोरगाव तेलंग, कोटीतीर्थ या बारा घाटावरील अवैध वाळू उपशावर कारवाईची जबाबदारी त्यांची राहील.
अर्धापूरच्या तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्याकडे नांदेड शहर, ब्रह्मपुरी, वजीराबाद, हसापुर, विष्णुपुरी, असर्जन, कवठा, वाजेगाव, बोंढार तर्फे हवेली यां घाटांची तर मुदखेडचे तहसीलदार सुजित नरहिरे यांच्यावर सांगवी बु, कामठा खु, ब्राह्मणवाडा, वांगी, नागापूर, सत्तारपूर, पुणेगाव, पिंपळगाव मिस्त्री, सिद्धनाथ, इंजेगाव, किकी, राहेगाव व भायगाव या घाटाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻