Tuesday, March 28, 2023

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये घेणार सभा; नियोजनासाठी मंत्री नांदेडमध्ये, खासदार- आमदारांनी केले सभास्थळाचे भूमिपूजन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये घेणार सभा आहेत. त्यांच्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे कायदा व वने मंत्री ए. इंद्रकरन रेड्डी या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी नांदेड दौऱ्यावर असून काल शनिवारी बीआरएस पक्षाच्या खासदार व आमदारांनी नांदेडमध्ये सभास्थळाचे भूमिपूजन केले.

महाराष्ट्र- कर्नाटक आणि महाराष्ट्र- तेलंगणा सीमाबाद सुरू असतानाच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थात के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाची महाराष्ट्रातील एन्ट्री नांदेडमधून करत असल्याची भूमिका यापूर्वीच बोलून दाखविली होती. त्यानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काल शनिवार दि. २८ रोजी गुरूव्दारा मैदानावर होणाऱ्या या सभेच्या स्थळाचे पूजन त्यांच्या पक्षाच्या खासदार- आमदारांच्या हस्ते करण्यात आले. तर आज त्यांच्या पक्षाचे कायदा व वने मंत्री ए. इंद्रकरन रेड्डी यांनी  सभास्थळाची पाहणी केली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची यापूर्वी नांदेडमध्ये सभा ही ठरली होती, मात्र मराठवाडा विधान परिषदेच्या निवडणुका संदर्भात लागलेल्या आचारसंहितेमुळे सभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बीआरएस मोठ्या ताकदीने महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या तयारीत असून येत्या ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये संवाद मेळावा सभेचे आयोजन करण्यात आले आहेत.

यावेळी माध्यमांशी बोलताना, खासदार भीमराव पाटील म्हणाले की, दि. ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री केसीआर हे नांदेडमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम गुरूव्दाराचे दर्शन घेतील. त्यानंतर येणा-या लोकांशी संवाद साधतील, त्यानंतर बैठक होईल. आठ वर्षाच्या काळात तेलंगणा सरकारची विकासकामे पाहून बरेचजण त्यांच्याकडे आले होते. आम्ही तुमच्याकडे येतो, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. राष्‍ट्रीय पक्ष तयार करून तुमची सेवा करू असे यावेळी केसीआर यांनी सांगितले होते. त्यानुसार पुर्वी आमचा पक्ष टीआरएस होता आता बीआरएस  (भारत राष्ट्र समिती) झाला आहे. प्रत्येकाला विकासाकडे जाण्याची इच्छा आहे. आमचे स्लोगनच आहे ‘अब की बार किसान सरकार’ फक्त आणि फक्त शेतक-यांसाठी काम करण्याची आमची इच्छा आहे. कोणत्याही पक्षाला विरोध अथवा मदत करायची नाही. भारतातील सर्व लोकांना तेलंगणा सारख्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी आमची पहिली बैठक नांदेडमध्ये होणार आहे. याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यावेळी अनेकांचे जाहीर प्रवेश होणार आहेत. यात पुढील जिल्हा, विभाग व राज्य कार्यकारीणी जाहीर होईल. बरेच जण संपर्कात असून त्यांची नावे आत्ता जाहीर करता येणार नाहीत. ५ फेब्रुवारी रोजी सर्व नावे समोर येतील, असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

यावेळी आमदार ए. जीवन रेड्डी, आमदार बल्का सुमन, आमदार जोगु रमण्णा, माजी महापौर रवींदरसिंग महाराज, माजी खासदार नागेश गेडाम,आमदार हणमंत शिंदे आदींची उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,753FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!