Tuesday, December 3, 2024

धक्कादायक: नांदेड जिल्ह्यात ११ वर्षाच्या मुलाकडून १० वर्षीय मुलीवर बलात्कार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻


नांदेड- कोरोनामुळे शाळकरी मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अशातच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडिताही अल्पवयीनच आहे. ती दहा वर्षीय असून या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नकळत्या वयात हातात इंटनेट आल्यामुळे हा भयावह प्रकार घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षाच्या मुलाने शेजारच्या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नकळत्या वयात हातात आलेल्या इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे कोवळ्या बालमनावर दुष्परिणाम वाढल्याचे या घटनेमुळे दिसून येत आहे.

या प्रकरणातील मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या शेजारी राहतात. ऑनलाईन शिक्षणासाठी ते एकत्र येत असत, अशी माहिती आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर मुलीने त्रास होत असल्याचे तिने घरच्यांना सांगितले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला, असे पोलिसांनी सांगितले. पीडिता आणि आरोपी दोन्ही अल्पवयीन असल्याने पोलीस बालरोग तज्ज्ञांसह मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!