Tuesday, October 15, 2024

धक्कादायक: मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆👆सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारीकरच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या आंदोलकांकडून वरील मजकुराच्या पोस्टद्वारे संताप व्यक्त केला जात आहे.

नांदेड- महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीने आज नांदेड जिल्ह्यात भीषण स्वरूप धारण केल्याचे समोर आले आहे. नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील हिमायतनगर येथे काही मराठा बांधव मागच्या दोन दिवसापासून साखळी उपोषणास बसले होते. यातील एका मराठा आंदोलनकर्त्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

जालना येथील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आमरण उपोषणापासून जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभरात उपोषणं सुरू आहेत. जरांगे पाटील यांनी तूर्त आमरण उपोषण सोडलं असलं तरीही ठिकठिकाणी आमरण किंवा साखळी उपोषणं सुरू आहेत.

अशातच नांदेड जिल्ह्यातील कामारी तालुका हिमायतनगर येथे काही मराठा बांधव मागच्या दोन दिवसापासून उपोषणास बसले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यात चालढकल होत असल्याची होत असल्याची भावना कामारी येथील युवक सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारीकर यांची निर्माण झाली. या प्रकाराला कंटाळून रविवार दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली.

हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्या ठिकाणी एक सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडली. सदर चिठ्ठीमध्ये त्याने “मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारी, शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे” असे स्पष्टपणे लिहिलेलं आढळून आले आहे. सदरील मराठा युवकाचा मृतदेह हिमायतनगर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

या धक्कादायक घटनेनंतर कामारी व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी व सकल मराठा समाजाने पालकमंत्री यांनी प्रत्यक्ष येऊन भेट दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती नातेवाईक व सकल मराठा समाजाच्या समन्वयक सुचिता जोगदंड पाटील यांनी केली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!