Saturday, June 22, 2024

नांदेडमध्ये ऑनर किलिंग: आई- वडिलांनीच केला पोटच्या मुलीचा खून; गावातील युवकासोबत होते प्रेमसंबंध, आई- वडील, मामा-काकांसह चुलत भावांचाही सहभाग

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- येथे ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई- वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीचा खून करून तिचे प्रेत जाळून टाकले. मुलीचे गावातील एका युवकासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून हा खून करण्यात आला आहे.

तालुक्यातील लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिपाल पिंप्री येथील बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी शुभांगी जोगदंड (वय २३) हिचे गावातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण आई- वडिलांना लागली होती. तिची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता. दरम्यान आई- वडिलांनी तिचा विवाह इतरत्र जुळवला होता. तरीही ती त्या प्रियकरासोबतच फोनवर बोलतच होती. आता आपली समाजामध्ये बदनामी होईल, याकारणाने आई- वडिलांनी शुभांगीचे मामा, काका व काकाच्या दोन मुलांना हाताशी घेऊन घेऊन शुभांगीचा खून केला. आणि तिला जाळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने राख इतरत्र फेकून दिली.

शुभांगी तीन दिवसांपासून बेपत्ता असून, ती नातेवाईकांकडेही नाही याची चर्चा पहिपाल पिंप्री गावात सुरु होती. गावातील काही नागरिकांनी गुरुवारी दि. २६ रोजी  लिंबगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पवार यांना माहिती दिली. श्री. पवार यांनी गोपनीयपद्धतीने चौकशी केली असता, शुभांगीच्या आई- वडिलांनी मामा, काका व काकाच्या दोन मुलांच्या मदतीने शुभांगीचा खुन करून पुरावा नष्ट केल्याची बाब समोर आली आहे.

याप्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून, खुनातील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या खुनामध्ये एकूण पाच आरोपी असून, अन्य तिघांचा शोध सुरु असल्याचे ठाणेदार चंद्रकांत पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान आई- वडिलांनी पोटच्या मुलीचा खुन केल्याच्या या घटनेमुळे नांदेड शहर व परिसर सुन्न झाले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!