Friday, June 9, 2023

नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, आज 643

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आज रविवारी कोरोना रुग्णसंख्येने 600 चा आकडाही पार केला. आज 643 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आज एकूण 2385 टेस्टिंग पैकी 643 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 364 आहे. आज 95 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 385 अहवालांपैकी 643 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 
558 तर अँटिजेन तपासणीद्वारे 85 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 806 एवढी झाली असून यातील 88 हजार 383 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला 2 हजार 
768 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 325, नांदेड ग्रामीण 35, भोकर 3, देगलूर 9, धर्माबाद 14, हिमायतनगर 3, कंधार 19, किनवट 17, लोहा 15, उमरी 4, मुदखेड 47, मुखेड 18, नायगाव 2, अकोला 4, परभणी 19, लातूर 1, हिंगोली 2, जालना 4, वाशीम 7, बुलढाणा 1, अमरावती 1, तेलंगना 1, औरंगाबाद 2, दिल्ली 1, गोंदिया 1, गडचिरोली 1, यवतमाळ 1, भिवंडी 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 39, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर 1, भोकर 1, बिलोली 16, देगलूर 2, किनवट 4, मुदखेड 3, मुखेड 9, नायगाव 5, परभणी 1, हिंगोली 1, जालना 1 असे एकुण 643 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 86, खाजगी रुग्णालय 5, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल मधील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.
 
आज 2 हजार 768 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 530, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 193, खाजगी रुग्णालय 17 अशा एकुण 2 हजार 768 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 18 हजार 564
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 10 हजार 573
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 93 हजार 806
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 383
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.21 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-87
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 768
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,803FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!