Monday, October 14, 2024

थरारक: नांदेडमध्ये माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या घरात बंदुकधारी घुसला; कुकचे डोके फोडले तर डी. पी. सावंत यांच्यावरही रोखली बंदूक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

सत्यपाल सावंत या कार्यकर्त्यांमुळे अनर्थ टाळला

नांदेड (प्रल्हाद कांबळे)- शहराच्या व्हीआयपी झोन असलेल्या शिवाजीनगर भागातील माजी राज्यमंत्री सावंत यांच्या घरात एक बंदुकधारी घुसला. त्याने माझे काम करा अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या नोकराला मारून टाकतो. अशी धमकी देत बंदूक दाखवली. हा थरार तब्बल अर्धा तास सुरू होता.

बहाद्दर कुकने त्याला ताब्यात घेतले. स्वतः जखमी झाला. त्यानंतर पळून गेल्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सत्यपाल सावंत यांनी त्याला पाठलाग करत डॉक्टर काब्दे यांच्या हॉस्पिटलजवळ पकडले. हल्लेखोर सध्या शिवाजीनगर पोलिसांच्या तावडीत आहे. बीड जिल्ह्याचा असल्याचे तो सांगतोय.

नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात माजी मंत्री डी. पी. सावंत यांचे निवासस्थान आहे. परिसरात पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर यांचेही निवासस्थान आहे. सोमवारी दि. ३० मे रोजी सकाळी आठ वाजता साहेबांना भेटण्यासाठी म्हणून बीड जिल्ह्यातून माने नावाचा युवक आला. परंतु अशोक चव्हाण नसल्याने तो थेट डी. पी. सावंत यांच्याकडे गेला. डी. पी. सावंत यांना त्यांनी सांगितले की माझ्या वडीलाचे आणि गावातील लोकांचा शेतीविषयक वाद आहे. तो वाद मिटवा. यावेळी माझा मतदारसंघ नाही मी काही करू शकत नाही तू आठ दिवसानंतर ये साहेबांना बोलू असे सांगून त्याला परत पाठविले.

त्यानंतर परत तो एक वाजता दुपारी घरी आला. यावेळी सावंत यांचा कुक सुभाष पवार यांना विचारले तर साहेब कुठे आहे तर त्यांनी सांगितले की साहेब आयटीएएमला आहेत. त्यानंतर तो तिथे गेला. मात्र काही त्याला समजले नसल्याने तो परत घरी आला. आणि चुकीची माहिती देता का मी उन्हात फिरतोय असे उलट बोलत सुभाष पवार यांच्यासोबत त्यांनी वाद घातला. सुभाष पवारने परत सावंत यांचे स्वीय सहाय्यक तांदळे यांच्याशी संपर्क साधला. यादरम्यान डी. पी. सावंत हे आपल्या घरी आले. यावेळी पुन्हा त्याच्याशी त्यांनी चर्चा केली. दरवाजा बंद केला. त्यानंतर सदर युवकाने पुन्हा दरवाजा ठोठावला आणि मला तुमच्याशी बोलायचे आहे मला न्याय द्या असे म्हणून तो विक्षिप्तपणे वागू लागला. सावंत यांनी त्याला समज देऊन बाहेर काढले. जवळपास अर्धा तास तो बाहेर बाकावर बसला. परत पाठीमागच्या दरवाजाने किचनमध्ये शिरला आणि किचनमध्ये थांबलेला सुभाष पवार यांच्याशी झटापट करून बंदूक लावली. किचनमधून आवाज येत असल्याने सामंत मध्ये गेले. यावेळी त्याने त्याला सोडले आणि डी. पी. सावंत यांच्याकडे बंदूक रोखली.

यादरम्यान सुभाष पवार यांच्या डोक्यावर त्याने बंदुकीचे मॅक्झिम मारून जखमी केले. यानंतर सावंत यांनी त्याला हळुवार बोलत बाहेर काढले. बाहेर पडताच तो पळाला दरम्यान युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सत्यपाल सावंत त्याठिकाणी आले असता डी. पी. सावंत यांनी त्यांना आवाज देऊन सांगितले. तोपर्यंत हा हल्लेखोर डॉक्टर काब्दे यांच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचला. मात्र सत्यपाल सावंत यांनी त्याचा पाठलाग करत त्याला हॉस्पिटल जवळ पकडले. आणि परत शिवाजीनगरला आणले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जखमी सुभाष पवार यांना शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा तरुण नेमका कोण आहे? याचे काम काय आहे याची सविस्तर चौकशी शिवाजीनगर पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन काशीकर आणि त्यांची टीम करत आहे. या घटनेनंतर शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!