ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड: ग्रामीण भागाला शहरीकरणाशी जोडण्यासाठी, शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा या अनुषंगाने आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याला विविध मार्गे जोडण्यासाठी नांदेड – अहमदपूर- लातूर आणि बोधन – मुखेड – लातूर या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संसदेत केली.
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेची अधिकाधिक आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे रेल्वेच्या अधिकाधिक सेवा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने गेली अनेक महिने प्रयत्न करत आहेत. खा. चिखलीकर यांच्यावतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आता याच अनुषंगाने बोधन- लातूर या नवीन मार्गाला मंजुरी दिल्यास तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यातील उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे. शिवाय माननीय पंतप्रधान महोदयाच्या संकल्पनेतील शेतकरी आणि ग्रामीण भागाला रेल्वे मार्गाने जोडून राष्ट्रीय दळणवळणाच्या साधनांसोबत पुढे आणले जाणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्यात यावी. नांदेड – लोहा- अहमदपूर – लातूर या नव्या मार्गाला मंजुरी देऊन या मार्गावरील सर्व गावांना रेल्वे लाईन जोडण्यात यावे. त्यामुळे विकासाला नवी चालना मिळेल आणि मराठवाड्यातील रेल्वे जाळे अधिकाअधिक वाढून ग्रामीण भागातही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील अशी असा विश्वास खा. चिखलीकर यांनी आज संसदेत व्यक्त केला.
या अधिवेशनात बोधन – मुखेड – लातूर आणि नांदेड- लोहा – अहमदपूर – लातूर या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन आर्थिक तरतूद करावी. या कामाला तातडीने सुरुवात करण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाला आदेशित करावेत अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻