Wednesday, July 24, 2024

नांदेड मध्यवर्ती बसस्थानकात राडा; संपात सहभागी होण्यावरून दोन बडतर्फ नियंत्रक व चालकाने केली कर्तव्यावरील वाहतूक नियंत्रकास बेदम मारहाण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– आम्ही संपात असून तू कर्तव्यावर हजर का झालास असे म्हणून एका वाहतूक नियंत्रकास दोन बडतर्फ वाहतूक नियंत्रक आणि एका चालकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. मध्यवर्ती बसस्थानकात हा प्रकार घडला असून या घटनेमुळे कर्तव्यावर हजर असलेले आणि संपात सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रविवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात दोन बडतर्फ वाहतूक नियंत्रक आणि एका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी महामंडळाचा संप मागील काही महिन्यापासून सुरू आहे. परंतु या संपामध्ये फूट पडल्याने काही कर्मचारी व अधिकारी आपले कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचारी वीरू बडतर्फ, निलंबित व संपकरी कर्मचारी असा तीव्र संघर्ष सुरू आहे. तरीही नागरिकांच्या सोयीसाठी व एसटी बस जिवंत राहील यासाठी काही कर्मचारी रिस्क घेऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

नांदेडमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या एका वाहतूक नियंत्रकास नांदेडच्या एसटी आगारामध्ये मारहाण करण्यात आली. ही मारहाण करणारे बडतर्फ वाहतूक नियंत्रक संतोष हरिचंद्र मोरे (राहणार कृष्णूर तालुका नायगाव), बडतर्फ वाहतूक नियंत्रक माधव कांगणे (राहणार मालेगाव रोड, नांदेड) आणि चालक शेख मोहम्मद गौस शेख अजगर (राहणार सिडको) यांनी कर्तव्यावर असलेले वाहतूक नियंत्रक गंगाधर विठ्ठलराव पोकले (वय ५६) यांना जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या केबिनच्या काचा फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. त्यांचे कॉलर पकडून आम्ही संपात सहभागी असताना तु ड्युटीवर का आलास म्हणून शिवीगाळ व मारहाण करून निघून गेले.

सदरची तक्रार देण्यासाठी गंगाधर पोकले हे वजिराबाद पोलिस ठाण्याकडे जात असताना त्यांना परत या तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी सव्वादोनच्या सुमारास अडविले. तिथेही त्यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी गंगाधर पोकले यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव करत आहेत. घटनास्थळाला पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) प्रभारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी भेट दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!