ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड-शहर आणि जिल्ह्यात वादळी-वारे, विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे मुखेड एका महिलेचा बळी गेला आहे. शहराच्या सिडको भागात झाडे उन्मळून पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत.
सिडको परिसरात अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागातील घरावरील पत्रे उडून गेली असुन नागरीक भयभयीत झाले आहेत. परिसरातील अनेक अंतर्गत भागात वृक्षे उन्मळून पडली आहेत. मुख्य रस्त्यावरही एक झाड कोसळल्याने दुचाकी वरील दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. ही घटना आज ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. घटनास्थळी तात्काळ नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोद्दीन यांनी अग्नीशामक दलाचा साह्याने वृक्ष काढून वाहतूक सुरळीत केली.
आज दुपारच्या वेळी अचानक वादळी वारे, विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे परिसराच्या अनेक भागातील घरांवरील पत्रे त्याचबरोब इतर वस्तू आणि कपडे उडून गेले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर मुख्य रस्त्यावरील सिडको ते लातुर फाटा रोडवरील वसंतराव नाईक महाविद्यालय परिसरात असलेल्या जुन्या ईमारतीच्या भागातील संरक्षक भिंतीच्या आतील भागातील मोठे झाड उन्मळून रस्त्यावरून दुचाकीवर जाणाऱ्या दिन जणांच्या अंगावर पडल्याने ते जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सिडको ते नांदेड दरम्यानची वाहतूक विस्कळित झाली होती. सिडको कार्यालय लगत असलेल्या जिजामाता वसाहत येथे ही वृक्षाचा फांद्या वादळी वारे मुळे तुटून पडल्या आहेत.
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांनी कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे यांच्यासह सफाई कामगार यांच्या सोबत पाहणी करून जुनी ईमारत वंसतराव नाईक महाविद्यालय सिडको परिसरातील मुख्य रस्त्यावरील उन्मळून पडलेले मोठे वृक्ष मनपाच्या अग्नीशामक दलाचे रईस पाशा व कर्मचारी यांच्या साह्याने बाजुला केले आहे. गुरूवार बाजार परिसरातील मनपा उधाण बगीचा मधील वृक्षे व अंतर्गत भागातील झाडे कटर मशिनच्या साहाय्याने काढण्याचे कामही करण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
या मान्सुनपुर्व पावसामुळे प्रशासन व नागरीक यांची धावपळ उडाली. सिडको लगतच्या औधोगिक वसाहतीत परिसरातील अनेक भागात कारखाना परिसरात वादळी वारे व मुसळधार पावसामुळे वृक्षे उन्मळून पडली आहेत. वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महिलेचा बळी
मुखेड तालुक्यात काही भागात मंगळवार दि. ३१ मे रोजी सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, अंबुलगा (बु.) येथे घरासमोर चंद्रकलाबाई व्यंकटराव झाडे (वय ४२) यांच्या अंगावर सायंकाळी सहाच्या सुमारास वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुक्रमाबादमध्येही जोरदार पाऊस झाला. मुखेड, धर्माबाद या तालुक्यांमध्येही रात्री काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाला तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻