Wednesday, February 28, 2024

पित्या पाठोपाठ मुलाचाही खून झाल्याचे उघड; नांदेड जिल्ह्यात खून करून मृतदेह विदर्भात नेऊन पुरला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/कुंडलवाडी- बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथून बेपत्ता झालेल्या पिता- पुत्रांमधीलपित्या पाठोपाठ मुलाचाही खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पित्याचा मृतदेह काल कुंडलवाडी ते शेळगाव मार्गावर पुरलेला आढळून आल्यानंतर आता मुलाचाही खून मृतदेह पुरण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपींनी मुलाचा मृतदेह विदर्भातील उमरखेड शिवारात नेऊन पुरल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातमी 👇🏻

कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुनगंदा शिवारात दि. 21 फेब्रुवारी रोजी परराज्यातुन हरभरा काढण्यासाठी आलेल्या दोन मजूर गटात रात्रीच्यावेळी जेवणावरुन व मजुरीच्या पैशाच्या कारणावरून वाद झाला. यातुन राजस्थानच्या पिता- पुत्राचे अपहरण करण्यात येऊन नंतर खून करण्यात आला. कुंडलवाडी पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी आणि तपास केल्यानंतर काल सोमवार दि. 1 मार्च रोजी पित्याचा दफन केलेला मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर आता बेपत्ता मुलाचाही मृतदेह पोफाळी ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथील शिवारात सापडला आहे.

कुंडलवाडी शिवारात सध्या स्थितीत हरभरा काढण्याचा हंगामा चालु असून राज्यासह परराज्यातील मळणी यंत्रधारक या परिसरात मोठ्या संख्येने आले आहेत. दि. २१ फेब्रुवारी रोजी आरोपी प्रमोद रमेश, बंटी निझाम सलामे, विनोद चुनु सलामे व दोन अल्पवयीन बालक सर्व राहणार पलासपाणी, ता. भिमपुरा जि. बैतूल (मध्यप्रदेश) व मयत रशीद खाँ हसना वय (४५) आणि त्यांचा मुलगा अमजद खाँ रशीद खाँ (वय १७) यांच्यात रात्रीच्या जेवणावरुन व मजुरीच्या पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर दि.२६ फेब्रुवारी रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात पिता- पुत्राचे अपहरण झालाची तक्रार रुदार खाँ झडमल खाँ राहणार भैंसरावत ता. गोविंदगड जि. अलवर राजस्थान यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात दिली.

दि.२७ रोजी चौकशीअंती अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सदर गुन्हाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक करिमखान पठाण यांनी सुरु केला. दरम्यान दोन दिवसाच्या कालावधीत आरोपींची चौकशी केली असता त्यांनी रशिद खान (वय ४५) यास ठार मारुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरुन टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर कुंडलवाडी ते शेळगाव मार्गावर मयत रशीद खाँ यास दफन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यातील बेपत्ता अमजद खाँ रशीद खाँ याचा शोध घेतला असता त्याचाही खून करून पोफाळी ता. उमरखेड शिवारात पुरल्याची आरोपींनी माहिती दिली. सर्व मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

धर्माबाद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी यांनी कसुन चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!