Friday, April 26, 2024

महिलेचे तुकडे करून गोदावरी नदीत फेकले; मानेपासून कमरेपर्यंतचा भाग आढळला, खुनाचा गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न 

नांदेड– एका अज्ञात महिलेचे तुकडे करून तिच्या मानेपासून कमरेपर्यंतचा भाग गोदावरी नदीत फेकण्यात आल्याचा धक्कादायक आणि अत्यंत निर्दयी प्रकार समोर आला आहे. महिलेच्या मृतदेहाची मान कापून, हात तोडून, पोटापासून पाय अत्यंत निर्दयीपणे तोडून तिच्या धडाचा भाग नदीपात्रात फेकून दिल्याचे यावरून दिसून येत आहे. मृतदेहाचा हा अर्धवट भाग तरंगताना आढळून आल्यावरून वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदी पात्रात बंदाघाट परिसरामध्ये एका महिलेचा खून करून अज्ञात मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करून अर्धे शरीर नदीपात्रात फेकून दिल्याचे आढळून आले. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या गोदावरी नदीपात्रात बंदाघाट जवळ एका महिलेचा (वय अंदाजे 25 ते 30 वर्ष) मानेपासून कमरेपर्यंतचा भाग असलेला अर्धवट मृतदेह तरंगताना आढळून आला. ही माहिती वजिराबाद पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, एपीआय शिवराज जमदडे यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा पंचनामा करून पाण्या‌तुन मृतदेह बाहेर काढला. सदरच्या मृतदेहाची मान कापून, हात तोडून, पोटापासून पाय अत्यंत निर्दयीपणे तोडून तिच्या धडाचा भाग नदीपात्रात फेकून दिल्याचे यावरून दिसून येत आहे. अन्य उर्वरित शरीराचे भाग पोलिसांना सापडले नाहीत. मारेकर्‍यांनी तिची ओळख पटू नये म्हणून आणि पुरावा नष्ट करण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस अंमलदार संतोष राठोड यांच्या फिर्यादीवरून अनोळखी मारेकर्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला नेमकी कुठली आणि कोण आहे याचा तपास वजिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवराज जमदडे करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!