Tuesday, October 15, 2024

बुधवारी राज्यपाल कोश्यारी नांदेडमध्ये; ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या 24व्या दीक्षान्त समारंभास राहणार उपस्थित

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा चोविसावा दीक्षान्त समारंभ बुधवार दि. १ जून २०२२ रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठ परिसरातील दीक्षान्त सभागृहामध्ये पार पडणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषविणार आहेत.

चोविसाव्या दीक्षान्त समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत असणार आहेत. त्याचबरोबर नवी दिल्ली येथील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक व वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे माजी सचिव डॉ. शेखर सी. मांडे हे प्रमुख पाहुणे स्नातकांना उद्देशून दीक्षान्त भाषण करणार आहेत. यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंहबिसेन यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी कळविले आहे.

सकाळी११:०० वा.विद्वंतजणांचे मिरवणूकीद्वारे दीक्षान्त सभागृहाकडे आगमन होणार आहे. विद्यापीठाचे गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सुवर्णपदक  विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे भाषण होणार आहे. शेवटी दीक्षान्तसमारंभाची समाप्ती घोषणा होऊन राष्ट्रगीताद्वारे कार्यक्रमाची सांगता होईल.

विद्यार्थी तथा अभ्यागतांसाठी पुढीलप्रमाणे काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळी १०:४०वा. पूर्वी दीक्षान्त सभागृहामध्ये येऊन आपले आसन ग्रहण करावे. सभागृहामध्ये येताना फोटोओळखपत्र आवश्यक आहे.विद्यार्थी तथा अभ्यागतांनी कार्यक्रम स्थळी येतांना सोबत कॅमेरा, हॅंडबॅग, ब्रिफकेस, लॅपटॉप,  आयपॅड, खाण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या घेऊन येऊ नये, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!