ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– श्रीनगर भागातील स्विस बेकरीसमोर पहाटे पाचच्या सुमारास एका टेम्पोला पाठीमागून जबर धडक बसल्याने बुलेटवरील दोघे युवक गंभीर जखमी झाले होते. या दोन्ही युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी काल 13 जून रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच जून रोजी देगलूर नाका परिसरातील खुदबईनगर येथील सय्यद मुद्दसीर मोईनुद्दीन (वय २५) आणि मिल्लतनगर येथील असलमबिन अली चाऊस (वय 28) हे दोघेजण श्रीनगर भागात बुलेट क्रमांक (एम एच२६- सीए- 90 83) वरून जात होते. त्यांची बुलेट श्रीनगर भागातील स्विस बेकरी समोर आलेली असताना त्यांच्या पुढे असणाऱ्या टेम्पो क्रमांक ( एम एच२६- एडी- 54 59) चालकाने टेम्पो निष्काळजीपणाने चालवून भरधाव वेगातच असतानाच अचानक ब्रेक मारला. यामुळे पाठीमागून येणारी वरील क्रमांकाची बुलेट भीषणपणे टेम्पोवर जाऊन आदळली. यात दोन्ही बुलेटस्वारांचा डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
त्यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर त्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी सय्यद मुजम्मिल सय्यद मोईनुद्दीन यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वाठोरे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻