ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर – भर सभेत वडिल कै.विलासराव देशमुखांच्या आठवणीने सिने अभिनेते रितेश देशमुख भावूक झाला. जेष्ठ बंधू माजी मंत्री आ.अमित देशमुख यांनी यावेळी पाणी देत त्यांना धीर दिला.
लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरातील दिवंगत विलासराव देशमुख पुतळा अनावरणाप्रसंगीचा प्रसंग… रितेश देशमुख यांचे भाषणाने त्यांच्या आई श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्यासह उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.
पुतळा अनावरणाप्रसंगी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजित कदम, चंद्रकांत हंडोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻