Wednesday, September 27, 2023

भारताच्या पोरांची जबरदस्त कामगिरी! पाचव्यांदा जिंकला विश्वचषक; अंडर 19 क्रिकेटच्या अंतिम सामन्यात इंग्लंडमध्ये भारताचा विजय

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अँटिग्वा– भारत आणि इंग्लंड यांच्यातील ICC अंडर-19 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साउंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला भारताने 189 धावांत गुंडाळले. त्यानंतर 190 धावांचे लक्ष्य 47.5 षटकांत 4 गडी शिल्लक असतानात पूर्ण करत भारताने या अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवला.

या अंतिम सामन्यात इंग्लंडचा कर्णधार टॉम पर्स्टने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लिश कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला नाही, कारण इंग्लंडचा निम्मा संघ 13 षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, मधल्या षटकांमध्ये संघाने बऱ्यापैकी फलंदाजी करत 44.5 षटकांत सर्वबाद 189 धावा केल्या.

इंग्लंडने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून निशांत सिंधू आणि शेख रशीद यांनी अर्धशतके झळकावली. या दोघांनी आणि त्यानंतरच्या फलंदाजांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 47.5 षटकांत 6 गडी गमावून 190 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि हा सामना 4 गडी राखून आपल्या नावावर केला. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जोशुआ बायडेन, जेम्स सेल्स आणि थॉमस ऍस्पिनवॉल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

भारतीय संघाचे हे पाचवे U19 विश्वचषक विजेतेपद ठरले आहे. भारताने यापूर्वी 2000 मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली प्रथम 19 वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता. त्यानंतर 2008 ( विराट कोहली), 2012 ( उन्मुक्त चंद) आणि 2018 ( पृथ्वी शॉ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली.

राज बावा ठरला विजयाचा शिल्पकार
भारताने तब्बल पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपची ट्रॉफी पटकावली आहे. ऑलराऊंड कामगिरी करणारा राज बावा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. राज बावाने आधी 9.5 ओव्हरमध्ये 31 रन देऊन 5 विकेट घेतल्या. यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडली असताना त्याने 54 बॉलमध्ये 35 रनची महत्त्वाची खेळी केली. या कामगिरीबद्दल राज बावाला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!