Thursday, June 1, 2023

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीनिमीत्त बाभळगाव इथे अनेकांकडून अभिवादन; लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आदरांजली, अनेकांनी दिला आठवणींना उजाळा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंती निमित्त बाभळगाव येथील ‘विलासबाग’ येथे देशमुख कुटूंबिय तसेच नागरिकांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख, सौ. सुवर्णाताई देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार  धीरज देशमुख, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, पोलीस अधिक्षक निखील पिगळे, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, सौ. दिपशिखा धिरज देशमुख, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, ललीतभाई शहा, चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार धनाजी साठे, अभय सांळुके, दिपक सूळ, अशोक गोविंदपूरकर, ॲड.व्ही.बी.बेद्रे, बसवराज पाटील नागराळकर, धनंजय देशमुख, यशवंतराव पाटील,  व्यंकटेश पूरी,  लक्ष्मणराव मोरे, समद पटेल, पंडीतराव धुमाळ, भाजपचे शैलेश लाहोटी यांच्यासह अनेकांनी पुष्पांजली अर्पण केली. विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष, राष्ट्र्वादी, भाजप, शिवसेनेसह अनेक पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांची उपस्थिती होती. याप्रसंगी स्व. विलासराव देशमुखांच्या अनेक आठवणी यावेळी दाटून आल्या.

याप्रसंगी विलासबाग, बाभळगाव येथे सुप्रसिद्ध संगीतकार डॉ. वृषाली देशमुख-कोरडे व शशिकांत देशमुख यांच्या सहकाऱ्यांकडून शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावदर्पण हा कार्यक्रम सादर  करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळकृष्ण धायगूडे यांनी  केले.

उजाळा साहेबांच्या आठवणींना’
स्व. विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीनिमीत्त लातूरच्या दयानंद सभागृहात ‘उजाळा साहेबांच्या आठवणींना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात स्व. विलासरावांचे मित्र माजी आमदार उल्हासदादा पवार, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी अनेक आठवणीना उजाळा देत, अनेक किस्से यावेळी सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. धिरज देशमुख, ऍड. मनोहरराव गोमारे, ऍड. बी.व्ही. मोतीपवळे, सोमनाथ रोडे यांची विशेष उपस्थिती होती. समस्त लातूरकरांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहर आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदरांजली 

 स्व. विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध ठिकाणी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. विलासराव देशमुख यांनी उभे केलेल्या मांजरा, रेणा, विलास सहकारी साखर कारखान्यात मांजरा परिवारातील जागृती साखर कारखाना इथे तसेच अनेक तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,790FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!