ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻


नांदेड- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री नांदेडहून एकाच हेलिकॉप्टरने परभणीकडे रवाना झाले. ते परत नांदेडला येऊन विमानाने रवाना होणार आहेत. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही आज नांदेडमध्ये आगमन झाले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
परभणी येथील नियोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण केले.
उद्धव ठाकरेही नांदेडमध्ये !
हिंगोली येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले. नांदेड विमानतळावरून ते हिंगोली येथील जाहीर सभेसाठी रवाना झाले. विमानतळावर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले.
शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचे नांदेडला पहिल्यांदाच आगमन झाले. त्यांचे जिल्ह्यात उत्स्फुर्त स्वागत झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विजय असो, उध्दव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
