Sunday, May 19, 2024

वाळु माफियांचा माजी सरपंचासह, भाऊ व पुतण्यावर सशस्त्र प्राणघातक हल्ला; सरपंचासह बारा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

संबंधित व्हिडिओ 👇

https://youtube.com/shorts/X1pfmUxcse0?feature=share

नांदेड– लोहा तालुक्यातील कामळज येथील माजी सरपंच व त्यांचा भाऊ, पुतण्यावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ नांदेडला आणण्यात आले असून, येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी ( ता. २५) दुपारी एकच्या दरम्यान घडली. दरम्यान उस्माननगर पोलीस ठाण्यात बारा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उस्माननगर पोलीसांनी दिली.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामळज येथे वाळु वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर धुळ उडून पिकांचे नुकसान होत असल्यााची तक्रार शेतकऱ्यांंनी, लोहा  तहसीलदार व कंधार विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने कामळज नदीपात्रातून तराफ्याच्या सहाय्याने राजरोसपणे वाळू उपसा सुरू होता. त्यामुळे येथील शेतकरी पांडुरंग बालाजी भरकडे, मारुती संभाजी भरकडे, बळीराम संभाजी भरकडे या बागायतदार शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२५) रोजी रस्त्यावर पाणी टाकून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी वाळूची वाहतुकीला विरोध केला. यामुळे चिडलेल्या वाळू माफियांच्या गटाने वरील तीन शेतकऱ्यांवर पाठलाग करुन लोखंडी रॉड, टॉमी व कुऱ्हाड, व्हीलपाना, लाठ्या काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला.

यात माजी सरपंच बळीराम भरकडे त्यांचे भाऊ मारुती भरकडे व पुतण्या पांडुरंग भरकडे यांच्या शरीरावर व डोक्यावर जबर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात फिर्यादी पांडुरंग भरकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केशव ढेपे, संदिप ढेपे (रा. मारतळा ), गोविंद जाधव, संजय जाधव, धनराज जाधव, मधुकर जाधव (रा. चिंचोली), संभाजी येडे, मारुती येडे, राजु येडे, दत्ता येडे (रा. कामळज )  कामाजी भरकडे, देवराव भरकडे (रा. कौडगाव ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांनी भेट देत तपासकामी सूचना दिल्या. हल्लेखोर आरोपी अद्यापही फरार असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!