ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहरात व परिसरात विनापरवाना पिस्तुलचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अंग झडतीत दोन पिस्तूल व मॅक्झिन जप्त केले आहेत. या गुन्ह्यात एका महिलेचाही समावेश असल्याचे पुढे आले आहे. हा प्रकार सात फेब्रुवारीच्या रात्री दहाच्या सुमारास नवीन मोंढा मार्केट कमिटीच्या परिसरात उघडकीस आला.
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने नवीन मोंढा भागात दोन गावठी पिस्टल पकडल्या. या आरोपीतांमध्ये सांगली येथील एका 22 वर्षीय महिलेचा समावेश आहे. दि. 7 फेबु्रवारीच्या रात्री 10 वाजता शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक अनंत नरुटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नवा मोंढा परिसरात कांही जण पिस्टल/ गावठी कट्टे घेवून फिरत आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. तेंव्हा नरुटे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कारवाईसाठी पाठवले. पोलिसांनी त्या ठिकाणी तेजस (वय 20) आणि संतोष तरटे (वय 21) या नांदेड शहारातीलच रहिवासी असणाऱ्या दोघांना पकडले. या प्रकरणात सांगली येथील एक 22 वर्षीय महिलेचा सुध्दा आरोपी असल्याची नोंद करण्यात आली आहे. या दोघांकडे दोन गावठी कट्टे सापडले आहेत.
एपीआय रवि वाहुळे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻