Friday, April 26, 2024

नांदेड महापालिकेचा रुग्णालयांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा दणका सुरूच; डॉक्टर लेनमधील गुरुराज हॉस्पिटलला ठोठावला दंड

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ जैविक कचराप्रकरणी दहा हजार रुपयांचा दंड

नांदेड– येथील महापालिकेचा रुग्णालयांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा दणका सुरूच असून बुधवारी डॉक्टर लेनमधील गुरुराज हॉस्पिटलला महानगरपालिकेच्या वतीने दंड ठोठावण्यात आला. महानगरपालिकेच्या घंटागाडी मध्ये रुग्णालयातील जैविक कचरा टाकल्या प्रकरणी महापालिकेच्यावतीने डॉक्टर लेन परिसरातील गुरुराज हॉस्पिटलला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बुधवार दि. 9 फेब्रुवारी रोजी मनपाच्या क्षेत्रिय कार्यालय क्रमांक चार हद्दीतील प्रभाग क्र.17 अंतर्गत वजिराबाद, डॉक्टर लेन येथील नांदेड गुरुराज हॉस्पीटल यांनी बॉयो-मेडीकल वेस्ट मनपाच्या घंटागाडीमध्ये टाकला. शहरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण केल्याच्या त्यांच्या या कृत्याबद्दल संबंधित हॉस्पीटलविरुद्ध दहा हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही करून दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच बोयो मेडीकल वेस्ट नियमांचे उल्लंघन करणा-या वैद्यकीय व्यवसायधारकाविरुद्ध कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्या हे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आहे. सदरची कारवाई आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उप-आयुक्त शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे सहा आयुक्त गुलाम मो. मादेक, क्षेत्रिय अधिकारी डॉ. राईसोद्दीन, मुख्य स्वच्छता निरिक्षक राजेंद्र गंदमवार, स्वच्छता निरिक्षक वसिम तडवी व ईतर कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील सर्व हॉस्पीटल, क्लिनिक, दवाखाने इत्यादी व्यवसाय धारकांना नांदेड- वाघाळा शहरमहानगरपालिकेच्या जाहिर आवाहन करण्यात आले आहे की, दैनंदिन निर्माण होणारा जैविक कचरा (Bio-medical waste) मनपाच्या घंटागाडीत किंवा सार्वजनिक ठिकाणी, रस्ल्यावर अनाधिकृत रित्या न टाकता मनपाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे सुपूर्द करुन मनपा प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा घनकचरा व्यवस्थापन नियम-2016 व बायोमेडीकल वेस्ट हॅन्डलीग रुल्स् 1998 मधील तरतुदीनुसार संबंधित वैद्यकीय व्यवसाय धारका विरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची सर्वानी नोंद घ्यावे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!