Wednesday, June 17, 2026

आज ‘ऑपरेशन टायगर’ अन् उद्या नांदेडमध्ये विधान परिषदेची निवडणूक! मतदारांमध्ये संभ्रम ! आष्टीकरांना नेमकी कुणाची मते !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

•कृष्णा आष्टीकर यांना नेमकी कुणाची मते मिळणार !

नांदेड (प्रतिनिधी)- आज दिवसभर राज्यसह देशभर ऑपरेशन टायगर ची चर्चा होत आहे यातच उद्या नांदेड विधान परिषदेची निवडणूक असून ऑपरेशन टायगरचा थेट परिणाम उद्याच्या निवडणुकीवर होईल असे दिसून येत आहे.

ऑपरेशन टायगर अंतर्गत हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात गेल्याचे सांगण्यात येत आहे. यातच त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर या विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मग आता कृष्णा पाटील अष्टीकर हे महाविकास आघाडीची मते मिळणार की महायुतीचीही अशी चर्चा नांदेडमध्ये रंगली आहे. माहितीने भाजपचे अंबरनाथ राजुरकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेले आहे.

राजूरकर महायुतीचे आणि खासदार आष्टीकरही महायुतीचे !

अशात अमरनाथ राजूरकर ही महायुतीचे आणि नागेश पाटील आष्टीकरही महायुतीचे अशी काहीशी संभ्रमाची स्थिती उद्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे.

काँग्रेस, महाविकास आघाडीमध्येही संभ्रम !

नांदेड विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने ऐनवेळी आपले उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांना अर्ज उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सांगितले. आणि शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आता खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना शिंदे गटासोबत अर्थात महायुतीसोबत गेल्याचे सांगण्यात येत असल्याने नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे त्यातही काँग्रेसची मोठी कोंडी झालेली दिसत आहे.

मतदान कोणाला ?

काँग्रेसचे मतदार आता नेमके कुणाला मतदान करणार हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. काँग्रेस आष्टीकरांच्याच पाठीशी राहणार की तटस्थ राहणार की तिसरे उमेदवार असणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांना मतदान करण्याचा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!