Sunday, December 22, 2024

नांदेडमध्ये कोरोना जिल्हाभर पसरला; आज 14 तालुक्यात 170 नवे रुग्ण आढळले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शहर आणि जिल्ह्याने कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून जिल्हाभर कोरोना पसरला आहे. आज तर एका दिवसात 170 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी कोरोना रुग्णसंख्येने शंभरी पार केली होती, त्यात वाढ होऊन काल कोरोना रुग्णसंख्येने दीडशेचा आकडा ओलांडला आहे. आज 170 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये आज नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात नांदेड, लोहा, कंधार, मुखेड, नायगाव, देगलूर, बिलोली, धर्माबाद, उमरी, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर या 14 तालुक्यांचा समावेश आहे. आज एकूण 1408 टेस्टिंग पैकी 170 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 76 आहे. आज 45 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एका ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 408 अहवालापैकी 170 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 119 तर अँटिजेन तपासणीद्वारे 51 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 315 एवढी झाली असून यातील 87 हजार 991 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 669 रुग्ण उपचार घेत असून 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 48, नांदेड ग्रामीण 10, बिलोली 2, धर्माबाद 5, हदगाव 8, हिमायतनगर 2, लोहा 15, माहूर 2, मुदखेड 12, मुखेड 2, नायगाव 1, उमरी 3, परभणी 4, वाशीम 1, पुणे 1, बिहार 3  तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 28, नांदेड ग्रामीण 5, बिलोली 6, धर्माबाद 1, देगलूर 1, हदगाव 1, कंधार 1, किनवट 5, लोहा 1, नायगाव 2 असे  एकुण 170 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 42, खाजगी रुग्णालय 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

आज 699 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 142, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 488,  खाजगी रुग्णालय 8 अशा एकुण 699 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 8 हजार 438
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 3 हजार 353
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 315
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 991
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-43
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-669
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

1 COMMENT

  1. आज पॉझिटिव्ह रुग्नांपैकी किती रुग्ण लस घेतलेले आहेत आणि कीती रुग्न लस न घेतलेले त्यातील लस घेतलेल्या रुग्नांची प्रकृती कसी आहे आणि लस नघेतलेल्या रुग्नांची प्रकृती कसी आहे याची काही माहीती बातमी लावली नाही आपण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!