Saturday, November 23, 2024

नांदेडमधील हळदी व्यापाऱ्याच्या घर आणि प्रतिष्ठाणांवर ‘जीएसटी’ पथकाच्या धाडी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहरातील नवीन मोंढ्यात हळदीचा व्यापार करणाऱ्या एका मोठ्या व्यापाऱ्यावर जीएसटीच्या पथकाने बुधवार दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी धाडी टाकल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील अनेक व्यापारी जीएसटी भरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर इतर जिल्ह्यातील जीएसटीच्या १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी दुपारी नवीन मोंढ्यातील हळदीचा व्यापार करणाऱ्या एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घर आणि प्रतिष्ठाणांवर एकाच वेळी पाच ठिकाणी धाडी टाकल्या. दुपारपासून अधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. या संदर्भात स्थानिक वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हे नांदेड जिल्ह्यातील अधिकारी नसून इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे जीएसटी पथक असल्याचे त्यांनी सांगितले. या पथकात नाशिक येथील जीएसटीचे केंद्रीय अधिकारी कुलथे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे कळते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!