Friday, November 22, 2024

माजी आमदार साबणे, बच्चेवार, केंद्रे, देशमुख, कदम, ठाकूर यांची भाजपाच्या प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणी मध्ये महत्त्वाची जबाबदारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपा निमंत्रित सदस्यपदी माजी आमदार सुभाष साबणे, बालाजी बच्चेवार, बाबुराव केंद्रे यांच्यासह सहा जणांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने  भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या निमंत्रित सदस्यपदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात सदस्यपदी माजी आमदार सुभाष साबणे, कंधारचे बाबुराव केंद्रे, अर्धापूरचे धर्मराज देशमुख, नायगावचे बालाजी बच्चेवार, हदगावचे चंद्रशेखर कदम आणि सिडको नांदेड येथील जनार्दन ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडी केल्या आहेत. नवनियुक्त सदस्यांचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त निमंत्रित सदस्य भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या अनुषंगाने नियोजन करून काम करतील अशी अपेक्षा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख,जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी, मिलिंद देशमुख आदींची उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!