Friday, November 22, 2024

पिस्तुलचा धाक दाखवून एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; शहराच्या सहयोगनगर मधील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- सहयोगनगर मध्ये राहणाऱ्या एकास पिस्तुलचा धाक दाखवून अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण करून एक लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि.15 फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास सहयोगनगर येथे घडला.

सहयोगनगर येथील विशाल रमेश सूर्यवंशी (वय ४१) यांना त्याच भागात राहणारे मुकेश उर्फ ऋतिक सूर्यवंशी आणि रोहित विजय सूर्यवंशी यांनी घरासमोर रस्त्यात अडवून थापड बुक्क्यांनी मारहाण केली. व्हाट्सअप व फेसबुकवर मुकेश सूर्यवंशी याने विशाल सूर्यवंशीच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरून अश्लील संदेश पाठवले. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता विशाल सूर्यवंशी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी विशाल सूर्यवंशी यांच्या वरील फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात मुकेश सूर्यवंशी आणि रोहित सूर्यवंशी यांच्याविरुद्ध खंडणी व भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी भेट दिली व तपासाच्या सूचना दिल्या.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!