Friday, November 22, 2024

छेडछाडीला कंटाळून माहेरवाशिणीची आत्महत्या; बिलोली तालुक्यातील धक्कादायक घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- बिलोली तालुक्यातील एका विवाहितेचा पाठलाग करून एक युवक तिची छेड काढत असे. एवढेच नाही तर अश्लील हावभाव करत विनयभंग करत होता. सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात त्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून बिलोली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी दिली आहे.

बिलोली तालुक्यातील एका विवाहितेचा पाठलाग करून तिची छेड काढणारा व माहेर असलेल्या मांजरम (तालुका नायगाव) येथील परमेश्वर काळसे (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर काळसे हा या विवाहीतेला माहेरी व सासरी वारंवार त्रास देत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला एकांतात भेट, भेटलीस नाहीस तर ठार करीन अशी धमकी देत होता. सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने दि. 28 फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले. तिला नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा दि.2 मार्च रोजी मृत्यू झाला.


तिच्या मृत्यूस परमेश्वर काळसे हा कारणीभूत असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिली. यावरून आरोपी परमेश्वर काळसे विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास स्वतः जाधव करत असून आरोपी परमेश्वर काळसे याला रविवारी रात्री अटक करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 7 मार्च रोजी बिलोली न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!