ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड-साेने खरेदीसाठी नांदेड ते पुणे असा ट्रॅव्हल्सने प्रवास करुन गेलेल्या एका सराफा व्यापाऱ्याच्या मुनीमाला पुण्यातील स्वारगेट परिसरातील ट्रॅव्हलसच्या थांब्याजवळील फुटपाथवर लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. कारमधून आलेल्या चार अनाेळखी इसमांनी अँटी करप्शनचे पोलीस अधिकारी असल्याचे सांगून नांदेडच्या सराफा व्यापाऱ्याच्या मुनीमाकडे 17 लाख रुपयांची रोकड व इतर ऐवज पुण्यात लूटण्यात आला आहे.
अँटी करप्शनचे पोलीस अधिकारी असल्याचे सांगून शस्त्राचा धाक दाखवून चार भामटयांनी १७ लाख ५८ हजार रुपयांची रोकड व ऐवज असलेली बॅग लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत स्वारगेट पाेलीस ठाण्यात मधुरम सत्यनारायण साेनी (वय-२७, रा.नांदेड) यांनी पाेलिसांकडे चार अनाेळखी इसमांविराेधात फिर्याद दिली आहे. ही घटना सात मार्च राेजी घडली असून सात मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साेनी यांचा कर्मचारी शंकर भालेराव हा साेने खरेदी करता नांदेड ते पुणे असा प्रवास करुन गेले हाेते. स्वारगेट परिसरात ते थांबले असताना, काळ्या रंगाच्या कार मधून त्याठिकाणी चार अनाेळखी व्यक्ती येऊन त्यांनी शंकर यांना आपण अँटी करप्शनचे पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले.
त्यानंतर पिस्टल सारख्या शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांना कार मध्ये बसवून त्यांचे ताब्यातील १७ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा दागिने आदी मुद्देमाल जबरदस्तीने चाेरुन नेला आहे. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻