ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांची विविध पथक बियाणी यांच्या मारेकऱ्यांच्या शोधात रात्रंदिवस एक करत आहेत. गुरुवारी दि. सातच्या रात्री शहरात नाकाबंदी दरम्यान लिंबगाव आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांना पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुलं (कट्टे) जप्त करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. या दोघांपैकी एकावर लिंबगाव आणि एकावर भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड शहरात मागील काही दिवसांपासून गावठी पिस्तुलांचा (कट्टे) सर्रास वापर गुन्हेगार करत आहेत. या गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आदी सर्वच अधिकारी अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत.
गुरुवारी रात्री नाकाबंदी दरम्यान संशयित फिरणाऱ्या दोघांना लिंबगाव आणि भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आहे. त्यांनी ही पिस्तुलं कुठून आणली, कशासाठी आणली या सर्व बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻