Friday, November 22, 2024

नांदेडच्या तरोडा नाका परिसरात अनेक दुकानांना आग, रस्त्यावर सर्वत्र धुरच धूर; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

आगीच्या ठिकाणचा व्हिडिओ 👇🏻

नांदेड– शहरातील तरोडा नाका परिसरात असलेल्या एका गादी घर आणि चिकन सेंटरला लागलेल्या आगीमध्ये आजूबाजूच्या दुकानांनाही आगीने घेरले. आगीचे लोळ आणि परिसरातील गर्दी लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनाही शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तब्बल दिड तासाने आग आटोक्यात आली.

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या टीन पत्र्यांमधील एका गादी घराला दुपारी १२ च्या सुमारास आग लागली. त्याच्या शेजारी असलेल्या चिकन सेंटर दुकानांनाही आगीने आपल्या कवेत घेतले. त्या सोबतच शेजारी दुसऱ्या चिकन दुकानाला आग लागली. पाहता-पाहता तीन-चार दुकानांना आग लागल्याने आगीचा लोळ व धूर मोठ्या प्रमाणात दिसत होता. लगेच महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे वाहन त्या ठिकाणी येऊन आग आटोक्यात आणली. या वेळी बघ्यांची प्रचंड गर्दी होती. दरम्यान या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प ठेवण्यात आली होती. आगीमध्ये नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे अद्याप समजले नसून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध पोलीस घेत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!