ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
धर्माबाद (जि. नांदेड)- बस स्टँडकडे निघालेल्या एका विद्यार्थिनीवर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धर्माबाद येथे घडली आहे. या घटनेत दोन विद्यार्थिनी थोडक्यात बचावल्या आहेत.
येथील जिजामाता कन्या शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकणारी तालुक्यातील चिकना येथील पंधरा वर्षीय विद्यार्थीनी स्वाती कामाजी आवरे ही शाळा सुटल्यानंतर चिकना गावाकडे जाण्यासाठी धर्माबाद येथील महाराष्ट्र बस स्टॅन्डकडे निघाली होती. याचवेळी तिच्यावर अंगावर विज पडल्याने ती ठार झाली. ही दुर्घटना आज गुरुवार दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली.
या विद्यार्थिनीला धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वेणुगोपाल पंडित यांनी सदर मुलगी मृत्यू पावल्याची माहिती दिली. स्वाती आवरे हिच्या मागे दोन मैत्रिणीही बससाठी जात होत्या, परंतु त्या थोड्या पाठीमागे असल्यामुळे थोडक्यात बचावल्या. या घटनेमुळे चिकना गावावर शोककळा पसरली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻