ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ लातूर- येथील महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
बाबासाहेब मनोहरे यांना अतिरिक्त आयुक्त नांदेड वाघाळा महानगरपालिका या पदावरून 20 ऑक्टोबरपासून कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी आयुक्त लातूर महानगरपालिका या पदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारावा तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी (छापवाले) यांनी हे आदेश जारी केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻