ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
व्हिडिओ 👇🏻
https://youtube.com/shorts/PhMrlDUDQF4?feature=share
किनवट (जि. नांदेड)- तेलंगणाच्या पार्डी गावातील एका लग्न समारंभात शनिवारी दि.२५ डीजेच्या तालावर ठेका धरलेल्या शिवणी येथील एका युवकाचा नाचता नाचता ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
किनवट तालुक्यातील शिवणी येथील रहिवाशी मुत्येन्ना विश्वनाथ जामगेवाड (वय २०) हा युवक शनिवारी तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यातील पार्डी या गावी नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेला होता. रात्री लग्नातील वरातीत डीजेच्या मोठ्या आवाजात तालावर नाचत असतानाच मुत्येन्ना याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात तो जमिनीवर कोसळला. त्याचे नातेवाईक मात्र नाचण्याचा व्हिडीओ काढण्यात मग्न होते. त्यानंतर मुत्येन्ना जागेवरच पडून असल्याचे पाहून नातेवाईकांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने त्याला नातेवाईकांनी तातडीने म्हैसा येथे उपचारासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु,जमिनीवर कोसळताच मुत्येन्नाचा मृत्यू झाला होता.
या ह्रदयद्रावक घटनेने लग्न समारंभावर शोककळा पसरली. शनिवारी रात्री उशिरा मुत्येन्नाचा मृतदेह शिवणी येथे आणल्यानंतर रविवारी दि.२६ दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शिवणी परिसरावर शोककळा पसरली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻