Friday, November 22, 2024

वाद मिटवण्यासाठी बोलावले आणि तलवारीने सपासप वार करत संपवले; नांदेडजवळील मुगट येथे मित्रानेच काढला मित्राचा काटा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- यापूर्वी झालेला वाद मिटविण्यासाठी मित्राला बोलावून घेऊन मित्रांनीच तलवारीने सपासप वार करीत मित्राचा खून केल्याची घटना नांदेडजवळील मुगट येथे घडली आहे.  याप्रकरणी मुदखेड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथील शिवराज बापूराव पुयड (वय 23) याचा मुगट येथील जितेश ढगे ( वय २२) नावाच्या युवकासोबत दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर त्याने हा वाद मिटविण्यासाठी शिवराजला मुगट येथे बोलावून घेतले. शिवराज पुयड मुगट येथे आल्यानंतर जितेश ढगे याने संगणमत करून मित्र राहुल कल्याणे याची मदत घेऊन शिवराज पुयडसोबत वाद घातला. आणि अचानक बेसावध असलेल्या शिवराजवर तलवारीने सपासप वार करून त्याचा खून केला. ही घटना समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे, नांदेड ग्रामीण उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक गोहर हसन, मुदखेडचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी भेट देऊन पाहणी केली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शिवराज पुयड याचा मृतदेह नांदेडच्या विष्णुपुरी रुग्णालयात आणण्यात आला. गुरुवार दुपारी शवविच्छेदनानंतर तणावपूर्ण वातावरणात त्याच्यावर पुणेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. मुदखेड पोलिसांनी तातडीने मारेकरी जितेश ढगे आणि राहुल कल्याणे यांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवार दिनांक चार ऑगस्ट रोजी या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!