ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
फेसबुक व्हिडिओ 👇🏻
https://fb.watch/nX5tgtBpNm/?mibextid=9R9pXO
कंधार (जि. नांदेड)– चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष असा नारा देत मराठा आंदोलकांनी सर्वच राजकीय पक्षाच्या पुढार्यांना गावबंदी केली आहे. यातच आजारी असलेल्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेलेले नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या. यावेळी मोठे तणावाचे वातावरण बनले होते. ही घटना गुरुवार दि. २६ रोजी रात्री नऊच्या सुमारास नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा येथे घडली.
व्हिडिओ 👇🏻
गावात प्रवेशबंदी असताना नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आंबुलगा गावात गेल्याने त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावबंदी असतानाही खासदार चिखलीकर गावात आल्याने अनेक ग्रामस्थ संतप्त झाले. संतप्त मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्या ताफ्यातील दोन गाडया फोडल्या. कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात काल रात्री ही घटना घडली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर रात्री अंबुलगा गावात गेले होते. कालच अंबुलगा गावात नेत्याच्या गाव बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. गावात चिखलीकर आणि त्याचे कार्यकर्ते गावात येताच समाजबांधव जमा झाले. वाद वाढत असल्याने खासदार चिखलीकर यांना लगेच पोलिसांनी रवाना केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻