Saturday, December 21, 2024

अंगणात थुंकल्याचे निमित्त! लहान भावाने मोठ्या भावाला चाकूने भोसकून ठार केले; नांदेड शहरातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवरायनगर येथे अंगणात का थुंकला म्हणून लहान भावाने सख्या मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना रविवार दिनांक 10 जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली. घटनेनंतर मारेकरी भाऊ पसार झाला आहे.

शहरातील मालेगाव रोडवर जैन मंदिर परिसरात जय शिवरायनगर भागात राहणारा सतीश बळीराम तुपसमुद्रे (वय 35) हा आणि त्याचा लहान भाऊ एकनाथ बळीराम तूपसमुद्रे (वय 30) हे दोघे एकमेकांशेजारी राहतात. अंगणात का थुंकला म्हणून सतीश तूपसमुद्रे याच्याशी एकनाथने वाद घातला. वाद एवढ्यावरच न थांबता एकनाथ तूपसमुद्रे याने घरात जाऊन कांदे कापण्याचा चाकू आणून सतीश तूपसमुद्राच्या छातीत सपासप वार केले. यात सतीश तूपसमुद्रे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरडाओरडा सुरु होताच एकनाथ तूपसमुद्रे हा फरार झाला.

घटनेची माहिती भाग्यनगर पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत किनगे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाचा पंचनामा करून सेवाविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे मृतदेह दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आले असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भाग्यनगर पोलीस ठाण्यात सुरु होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!