ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शिवसैनिकाच्या घराला पोलीस सुरक्षा देण्याची गरज नाही. स्वतःच्या घराची सुरक्षा करण्यासाठी शिवसैनिक नेहमी समर्थ असतो, असे म्हणत हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी पोलीस अधिक्षकांना पत्राद्वारे घराला दिलेली सुरक्षा काढुन घेण्यास सांगितले आहे. जो अंगावर येईल त्यास शिंगावर घेऊ असा सज्जड इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शहरातील त्यांच्या ‘तुकाई’ निवासस्थानी काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र खासदार हेमंत पाटील यांनी गुरुवारी दि.२१ जूलै रोजी पोलीस प्रशासनाने पुरविलेल्या बंदोबस्ताबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानत ‘तुकाई’ निवासस्थानवरील पोलीस बंदोबस्त मागे घ्यावा असे पोलीस अधिक्षकांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी नेहमी सर्वसामान्य जनतेची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. याच सर्वसामान्य जनतेच्या जोरावर नगरसेवक पदापासून ते भारताच्या सर्वोच्च सभागृहाचे मी खासदार म्हणून लाखो लोकांचे प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे माझा माझ्यापेक्षा जास्त येथील जनतेवर व कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. त्यातूनही विरोधक म्हणून काही समाजकंटकांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना शिंगावर घेण्याकरिता मी सक्षम आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना ठणकावले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻