ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष किशनराव वारखिंडे यांचे आज निधन झाले. देगलूर तालुक्यातील गवंडगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते 86 वर्षें वयाचे होते.
पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असताना आज दि.?26 जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा गवडगांव, ता.देगलुर, जिल्हा नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात संघटन केले होते. त्यांचा निधनाने मराठा चळवळीतील एक ज्येष्ठ नेता हिरावला गेला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
