Tuesday, October 15, 2024

आज कोरोना रुग्णसंख्येत आणखी वाढ; शहरासह नांदेड जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांमध्ये रुग्ण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यामध्ये आज कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. नांदेड शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढले असून जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांमध्ये आज नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आज एकूण 1110 टेस्टिंग  पैकी 82 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 46 आहेत. तर आज 09 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 110 अहवालापैकी 82 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर अँटिजेन तपासणीद्वारे 14 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 834 एवढी झाली असून यातील 87 हजार 907 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 272 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 36, नांदेड ग्रामीण 10, अर्धापूर 2, बिलोली 1, देगलूर 3, धर्माबाद 1, कंधार 1, लोहा 3, मुदखेड 1, नायगाव 2, मुखेड 1, हिंगोली 1, पंजाब 2, परभणी 4 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 10, नांदेड ग्रामीण 3, किनवट 1 असे एकूण 82 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 7, खाजगी रुग्णालय 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  

आज 272 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 40, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 203,  खाजगी रुग्णालय 9 अशा एकुण 272 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 4 हजार 157
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 99 हजार 705
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 907
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 834
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-8
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-272
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!