ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
इस्लापूर (जि.नांदेड)– दारु पिण्याच्या कारणावरून वडील आणि मुलांत झालेल्या वादानंतर, वडिलांनी मुलाला एक थापड लगावली. याच रागात मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव तांडा ता. किनवट येथे घडली आहे.
रमेश पुंडलिक आडे (रा. नांदगाव तांडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि.१० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या घरात त्यांचे वडील पुंडलिक विठ्ठल आडे (वय ४२) हे दारु पित असतांना त्यांचा मुलगा किशोर पुंडलिक आडे (वय २१) हा घरात आला आणि त्याने वडिलांना, दारु का पितात, दारु पिऊन आईला का त्रास देता या विचारणा केली. या विचारण्याचा वडील पुंडलिक आडे यांना राग आला. रागात त्यांनी आपला मुलगा किशोरच्या कानशिळात लगावली. वडिलांनी मारताच किशोरने आपले वडील पुंडलिक यांना जमिनीवर खाली पाडून घरात ठेवलेले किटकनाशक त्यांना पाजण्याचा प्रयत्न केला. ते किटकनाशक तोंडात गेले नाही, तेंव्हा किशोर आडेने लाकडी दांडा हातात घेतला आणि आपले वडील पुंडलिक आडे यांच्या डोक्यात तो लाकडी दांडा मारुन त्यांचा खून केला.
इस्लापूर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांच्याकडे देण्यात आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻