Saturday, July 27, 2024

आनंदनगर भागात कॉफी शॉपवर अश्लील चाळे करताना ७ जोडप्यांना पकडले; दामिनी पथकाची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

कॉफी चालकांकडून दोन खंजर जप्त

नांदेड– विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर परिसरात असलेल्या दोन कॉफी शॉपमध्ये प्रेमीयुगल अश्लील चाळे करत असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. यावरून दामिनी पथकाच्या नूतन फौजदार सावित्रा रायपल्ले यांनी कारवाई केली. यावेळी त्यांनी सात मुलं आणि सात मुलींना ताब्यात घेतले. यावेळी कॉफी चालक दोघांकडे खंजर आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

आनंदनगर परिसरात असलेल्या दोन कॉफी शॉपमध्ये मुलं आणि मुली अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या सावित्री रायपल्ले आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी कारवाई करीत सात मुलं आणि सात मुली यांना ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे कॉफी शॉप चालक यांच्याकडून खंजर जप्त करण्यात आला आहे. फौजदार सावित्रा रायपल्ले यांनी या सर्वांना विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॉफी शॉप चालक सय्यद राशेद, सय्यद हर्षद आणि चंद्रकांत गजभारे यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. मुलींना आणि अन्य मुलांना प्रतिबंधात्मक कारवाई करून सक्त ताकीद दिली व त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!