Monday, October 14, 2024

आमदार बालाजी कल्याणकर यांच्या घरासमोर शिवसैनिकांचा राडा; तिरडी काढून केला निषेध, तणावाचे वातावरण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

व्हिडिओ 👇🏻

नांदेड- आमदार बालाजी कल्याणकर यांनी बंडखोरी करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तमाम शिवसैनिकांना धोका दिल्याची टीका करीत संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज नांदेडमध्ये त्यांच्या संपर्क कार्यालयावर धडक मारली. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. त्यांच्या निवासस्थानासमोर शिवसैनिकांनी प्रचंड घोषणा दिल्या. तब्बल एक तास शिवसैनिकांचे आंदोलन सुरू होते. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भाग्यनगर पोलीस ठाण्यात नेले.

या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे मालेगाव- नांदेड रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. आंदोलनात प्रामुख्याने भुजंग पाटील, प्रकाश मारावार, डॉ. मनोज भंडारी, महेश खेडकर, माधव पावडे, जयवंत कदम, उद्धव शिंदे, साई विभुते, शाम वानखेडे, नवज्योत सिंग गाडीवाले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!